पैठण, (प्रतिनिधी): पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा पैठण फुलंब्री च्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यामध्ये नगराध्यक्ष पदाचे ०६ तर सदस्य पदाचे १०६ नामनिर्देशन पत्र बाद ठरले आहेत. अध्यक्ष पदासाठी १४ तर सदस्य पदासाठी २९० नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. मंगळवारी झालेल्या छाननी मध्ये नगराध्यक्ष पदाचे ०६ तसेच सदस्य पदाचे १०६ नाम निर्देशन पत्र बाद ठरले आहे.
आता नगराध्यक्ष पदासाठी ८ तर सदस्य पदासाठी १५६ नामांकन पत्र वैद्य ठरले आहेत. नामनिर्देशन पत्र छाननी प्रक्रियेत अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ज्योती पवार तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे याच बरोबर गट विकास अधिकारी गायकवाड यांचा आक्षेप अर्ज फेटाळला.
प्रभाग तीन (अ) मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार जगदाळे आशा विश्वनाथ यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री राजू गायकवाड प्रभाग तीन (अ) यांनी अॅड. पी. डी. निवारे यांच्यामार्फत छाननीच्या वेळी उमेदवार जगदाळे अशा विश्वनाथ यांना चार आपत्य असल्याने त्यांना निवडणूक नियमानुसार निवडणूक लढवता येणार नाही. त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरण्यात यावा, अशी लेखी तक्रार केली होती. सोबत आपत्यांचे निर्गम उतारे जोडण्यात आले होते.
मनोरमा गायकवाड, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश कांबळे यांनी सहकार्य केले.
दरम्यान सर्व अर्जाची सुनावणी झाल्या नंतर या आक्षेप अर्जावर निवडणूक निर्णय अधिकारी नीलम बाफना यांनी सुनावणी घेतली. यावेळी जगदाळे अशा विश्वनाथ यांच्या वतीने अॅड. प्रीतम साबू यांनी
लेखी स्वरूपात बाजू मांडताना स्पष्ट केले की जगदाळे अशा यांच्या बाबतीत तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी १८ जानेवारी २०१८ रोजी पारित केलेल्या आदेशाची प्रत जोडली.
तसेच जगदाळे आशा यांना चार आपत्य असल्याचे कोणत्याही प्रकारे पुरावे किंवा
वैद्यकीय पुरावे देता सादर केले नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नीलम बाफना यांनी सर्व दस्तऐवज तपासून महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम १९६६ मधील नियम १३ (२),१३ (५) नुसार राजेश्री राजू गायकवाड यांचे आक्षेप फेटाळले. जगदाळे आशा विश्वनाथ यांचे नाम निर्देशन पत्र स्वीकारले.















